Agriculture Agrowon
हवामान

Weekly Weather: हिवाळी हंगाम अस्ताच्या मार्गावर; महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल

Summer Season: हिवाळा संपण्याच्या मार्गावर असून, महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असून, एप्रिल-मे महिन्यात तीव्र उष्णतेचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Maharashtra Climate: महाराष्ट्रावर आजपासून मंगळवार (ता.१६ ते १८)पर्यंत हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. म्हणजेच या तीन दिवसांत सकाळी व पहाटे थंडीचे प्रमाण चांगले राहील. दुपारी मात्र हवामान उष्ण राहील. बुधवारी (ता. १९) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल, गुरुवार (ता.२०) १००८ हेप्टापास्कल, शुक्रवार (ता.२१) १०१० हेप्टापास्कल आणि शनिवार (ता.२२) पुन्हा १०१२ हेप्टापास्कल राहतील. अशाप्रकारे हवेचे दाबात बदल होत असल्याने थंडीच्या प्रमाणातही दररोज चढउतार जाणवतील.

हवेचे दाब कमी होतात, त्या वेळी तापमानात वाढ होऊन थंडीचे प्रमाण कमी झालेले असते. यावरून हिवाळी हंगाम अस्ताच्या मार्गावर असून, लवकरच उन्हाळी हंगामाची चाहूल दिसून येत आहे. या वर्षीचा उन्हाळी हंगाम लवकर सुरू होत आहे. एप्रिल- मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढेल व कडक उन्हाळा जाणवेल. या वर्षी जानेवारी महिना हा आतापर्यंतच्या जानेवारी महिन्यापेक्षा उष्ण ठरला आहे. यापुढील काळात बाष्पीभवनाचा वेग वाढेल. पिकांची, जनावरांची, मानवाची पाण्याची गरज वाढेल. कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहील. हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी होईल. दुपारी हवामान उष्ण व कोरडे राहील. तापमान वाढ व हवामान बदल जाणवतील.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ २० अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. सध्या तरी ‘ला निना’चा प्रभाव नाही. हिंदी महासागराच्या व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस असल्याने सध्या तरी मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होणार नाही. त्यामुळे ढगाळ वातावरणाची शक्यता कमी असेल.

कोकण :

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, सिंधदुर्ग जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६० ते ६६ टक्के, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७५ ते ७८ टक्के राहील. पालघर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के राहील. रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ किमी राहील. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ किमी राहील.

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्यता आहे. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि नंदूरबार जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ६६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार जिल्ह्यात ३१ टक्के, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात १७ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा पश्‍चिमेकडून व वायव्येकडून राहील.

मराठवाडा :

कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, लातूर, नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, जालना व धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर परभणी व जालना जिल्ह्यांत १८

अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात ६१ टक्के, तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५२ ते ५८ टक्के राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ किमी राहील. धाराशिव व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ किमी राहील. मात्र जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १० किमी राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पश्‍चिमेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ :

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ६३ टक्के, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ५८ टक्के आणि वाशीम जिल्ह्यात ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ :

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ६१ ते ६७ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १८ ते २१ टक्के इतकी कमी राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७२ ते ७४ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ७६ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २१ ते २२ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २३ ते २४ टक्के राहील. त्यामुळे हवामान दुपारी अत्यंत कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी इतका सामान्य राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्य व पश्‍चिमेकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

कमाल तापमान कोल्हापूर, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. तर सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अहिल्यानगर जिल्ह्यात ४८ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ५४ टक्के, तर पुणे जिल्ह्यात ६२ टक्के, सांगली जिल्ह्यात ७३ टक्के आणि कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ८१ ते ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत २० ते २३ टक्के, तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत १३ ते ३७ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला :

- भेंडी, कोथिंबीर, गवार, दुधी भोपळा, काशी भोपळा, दोडका लागवडीची कामे पूर्ण करावीत.

- आंबा मोहराचे संरक्षण करावे.

- हळद काढणी करून शिजवून योग्य प्रक्रिया करावी.

- जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT