Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात उन्हाच्या झळा

Hot Weather : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने ऐन थंडीत उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने ऐन थंडीत उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. ३) कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. रविवारी (ता. २) राजस्थानमधील गंगानगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. रविवारी (ता. २) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमानात झालेल्या वाढीने थंडी गायब झाली आहे.

उन्हाचा चटका कायम असल्याने कमाल तापमान ३६ अंशांच्या पार पोचले आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे घामटा निघत आहे. रविवारी (ता. २) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सोलापूर आणि वाशीम येथे ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जेऊर, अकोला ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ येथे पारा ३५ अंशांपार आहे. आज (ता. ३) किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.१---१४.८

अहिल्यानगर---३४.१---निरंक

धुळे---२९.०---९.६

जळगाव---३२.०---१५.६

जेऊर---३५.५---१५.०

कोल्हापूर---३३.४---१९.५

महाबळेश्वर---२९.५---१७.५

मालेगाव---३१.२---१५.०

नाशिक---३३.३---१३.४

निफाड---३३.०---११.८

सांगली---३४.४---१८.२

सातारा---३४.३---१६.०

सोलापूर---३६.४---२०.२

सांताक्रूझ---३१.४---१६.६

डहाणू---२९.२---१७.५

रत्नागिरी---३२.८---१८.४

छत्रपती संभाजीनगर---३३.२---१६.५

धाराशिव---निरंक---१४.४

परभणी---३४.६---१७.४

परभणी (कृषी)---३४.१---१४.३

अकोला---३५.४---१७.६

अमरावती---३४.६---१५.१

भंडारा---३३.६---१९.०

बुलडाणा---३४.०---१८.२

ब्रह्मपुरी---३६.२---१७.४

चंद्रपूर---३४.६---निरंक

गडचिरोली---३३.४---१७.६

गोंदिया---३३.६---२०.४

नागपूर---३४.६---१७.०

वर्धा---३५.०---१८.२

वाशीम---३६.४---१९.२

यवतमाळ---३५.०---१७.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT