Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यात थंडी पुन्हा वाढणार ? राज्यातील पावसाळी वातावरण निवळले

Weather Update : महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळल्याचे दिसते. त्यामुळे पहाटेच्या किमान तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचेल, असा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले आहे. तसेच ढगाळ वातावरणाची शक्यताही दिसत नाही. काही ठिकाणी सकाळी हवेतील गारवा जाणवत आहे. पुढील काळात हवेतील गारवा वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळल्याचे दिसते. त्यामुळे पहाटेच्या किमान तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचेल, असा अंदाज आहे.

२ ते ३ दिवसानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता असून संक्रांती दरम्यान चांगली थंडी जाणवण्याची अपेक्षा आहे. विदर्भात लगेच चांगली थंडी पडू शकते,  असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

एका मागे एक पश्चिमी झंजावात साखळी उत्तर भारतात सुरूच आहे. उद्या मध्यम पश्चिमी झंजावात वायव्येकडून येऊन अपेक्षित थंडीला पूरक ठरू शकते. दक्षिणेतील हिवाळी पावसाचा हंगाम आटोपण्याची शक्यता असताना, अजूनही केरळ, तमिळनाडू राज्यात पावसाचा जोर कायम आहे.

यामुळेच महाराष्ट्रात आता जसे दोन दिवस वातावरण बदलले. तसे वातावरणात बदल होत आहे. तीन आठवडे उलटले तरी पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये अजून दाट धुक्याची चादर दिसते. अजूनही काही दिवस ही स्थिती राहू शकते. याचा परिणाम खानदेशातील जिल्ह्यांमध्ये होत आहे, असेही खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील ९२ हजारांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची मागणी; १५ दिवसांची मुदत

Nashik Sugar Factory Crisis : ‘नासाका’चा १७ कोटींचा ऊस बिल घोटाळा? शेतकऱ्यांची थकीत पैशांसाठी चौकशीची मागणी!

Heat Stress in Cattle: जनावरांमध्ये उष्णतेच्या ताणाचे ६ परिणाम, उष्णतेचा ताण कसा ओळखावा; लक्षणे काय?

Nanded Farmer Death: पीक गेलं, कर्ज वाढलं, मुलीच्या शिक्षणाचा खर्चही पेलवेना; नांदेडमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Annapurti Grain ATM : आता रेशनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; नाशिकमध्ये 'अन्नपूर्ती धान्य एटीएम'ची डिजिटल क्रांती

SCROLL FOR NEXT