Weather Update Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा, तर विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Heat Wave Update : उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीचा, तर विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गोंदिया, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, परभणी येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून बिहार पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, आज (ता. ३) विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात उष्ण व दमट असह्य होण्याची शक्यता आहे. राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे, सातारा जिल्ह्यात गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.५ (२३.८), जळगाव - (२७.९), धुळे ४२.० (-), कोल्हापूर ३६.१ (२३.३), महाबळेश्वर २९.९ (१८.०), नाशिक ३५.९ (२४.४),

निफाड ४०.६ (२६.०), सांगली ३६.९ (२३.०), सातारा ३८.५ (२३.५), सोलापूर ४१.९ (२५.५), सांताक्रूझ ३४.५ (२८.९), डहाणू ३४.८ (२९.३), रत्नागिरी ३४.० (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ४०.६ (२४.२), नांदेड ४२.६ (२७.८), परभणी ४३.० (२८.०), अकोला ४३.४ (३१.०), अमरावती ४३.६(२७.७), बुलढाणा ४०.० (२६.८), ब्रह्मपूरी ४२.८ (२७.७),

चंद्रपूर ४३.२(२६.६), गोंदिया ४३.५ (२६.२), नागपूर ४३.० (२५.६), वर्धा ४३.४(२९.४), वाशीम ४२.६(२७.४) यवतमाळ ४२.७ (२९.०).

कमी दाब क्षेत्रासाठी पोषक वातावरण

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनची वाटचाल जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अरबी समुद्रातील प्रगती करत शुक्रवारी (ता. २) लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली. शनिवारी (ता. ३) मॉन्सूनची वाटचाल जैसे थे होती. मॉन्सूनचे केरळातील आगमन यंदा लांबले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT