Unseasonal Rain Agrowon
हवामान

Unseasonal Rain Alert: राज्यात अवकाळीचे वातावरण; कोकण वगळता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात शनिवारपर्यंत भागपरत्वे त्या त्या क्षेत्रात केवळ दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

Anil Jadhao 

Pune News : महाराष्ट्रात शनिवारपर्यंत भागपरत्वे त्या त्या क्षेत्रात केवळ दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटी सारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक जाणवते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असे वाटते. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली या अकरा जिल्ह्यांत शुक्रवार आणि शनिवारी अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.

विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि जळगाव, दक्षिण अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत शुक्रवारी अवकाळी वातावरणाचा प्रभाव अधिक जाणवेल. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवणार नाही, अशी शक्यताही खुळे यांनी व्यक्त केली.

शनिवारपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २ ते ३ अंशाने घटण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत मात्र सध्या असलेल्या तापमानात बदल न होता कायम राहील, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT