Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast: पूर्व विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

Rain Alert: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना हवामान विभागाने पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. अकोल्यात तापमान ४५ अंशांवर पोहोचले असून, चंद्रपूर, अमरावती, परभणी आदी ठिकाणीही पारा ४४ अंशांवर गेला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. २) उन्हाची ताप कायम राहण्याबरोबरच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

नैर्ऋत्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

‎गुरूवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎‎अकोला ‎येथे राज्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ‎उन्हाचा चटका वाढल्याने ‎चंद्रपूर आणि अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, ‎सोलापूर, जळगाव, धुळे, ‎जेऊर, परभणी आणि ‎वर्धा येथे ४३ अंशांपेक्षा अधिक, तसेच ‎वाशीम, ‎मालेगाव, ‎छत्रपती संभाजीनगर, ‎धाराशिव आणि ‎ब्रह्मपुरी येथे ४२ अंशापेक्षा अधिक, तर ‎बुलढाणा, ‎नागपूर आणि यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

‎आज (ता. २) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहणार असून, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

४४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎अकोला ४५, ‎चंद्रपूर ४४.२, अमरावती ४४.

गुरूवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३९.७---२२.५

‎‎धुळे---४३.०---१९.८

‎जळगाव---४३.५---२७.२

‎जेऊर---४३.०---२२.०

‎कोल्हापूर---३६.०---२३.१

‎महाबळेश्वर---३२.५---२१.४

‎मालेगाव---४२.०---२५.६

‎नाशिक---३८.९---२२.२

‎निफाड---४०.४---२०.५

‎सांगली---३९.४---२३.३

‎सातारा---४०.७---२३.३

‎सोलापूर---४३.६---२७.६

‎सांताक्रूझ---३३.९---२६.०

अलिबाग---३५.७‎---निरंक

डहाणू---३५.५---२५.८

‎रत्नागिरी---३३.४---२५.२

‎छत्रपती संभाजीनगर---४२.४---२५.४

‎धाराशिव---४२.०---२३.४

‎परभणी---४३.७---२६.४

‎परभणी (कृषी)---४३.०---२२.४

‎अकोला---४५.०---२८.०

‎अमरावती---४४.०---२८.०

‎भंडारा---३९.६---२६.२

‎बुलढाणा---४१.१---२७.७

‎ब्रह्मपुरी---४२.९---२५.९

चंद्रपूर---४४.२---निरंक

‎गडचिरोली---४०.२---२४.०

‎गोंदिया---३७.४---२४.२

‎नागपूर---४१.६---२७.७

‎वर्धा---४३.२---२८.५

‎वाशीम---४२.४---निरंक

‎यवतमाळ---४१.६---२७.०

सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२४.०---४५.०

‎मराठवाडा---२२.४---४३.७

‎पश्‍चिम महाराष्ट्र---२१.४---४३.६

‎उत्तर महाराष्ट्र---१९.८---४३.५

‎कोकण---२५.२---३५.७

वादळी पावसाची शक्यता ( येलो अलर्ट) :

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT