Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा कायम

कमाल तापमान वाढल्याने विदर्भात पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कमाल तापमान वाढल्याने विदर्भात पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, काही ठिकाणी पावसाने (Rainfall) हजेरी लावली आहे.

आज (ता. १) विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा (Rain Prediction) देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असतानाच शुक्रवारी (ता. ३१) दुपारनंतर औरंगाबाद, जालना आणि नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या.

संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह कांदा पिकाचे नुकसान होणार आहे. आंबा पिकालाही या पावसामुळे फटका बसणार आहे.

दरम्यान शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा आणि ब्रह्मपूरी येथे देशातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच पारा चाळीशीपार गेला आहे.

विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान ३८ अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ ते २५ अंशांच्या दरम्यान होता.

मध्य उत्तर प्रदेश पासून मध्य प्रदेश, विदर्भ, ते तेलंगाना पर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत.

पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर, तसेच उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात ढगाळ हवामान आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. १) विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.९ (१९.९), नगर - (१६.४), जळगाव ३६.५ (१८.८), धुळे ३६.० (१९.०), कोल्हापूर ३३.६ (१८.८), महाबळेश्वर २८.६ (१४.९),

नाशिक ३१.२ (१९.७), निफाड ३५.१(१२.५), सांगली ३५.५ (१८.४), सातारा ३४.५ (१७.८), सोलापूर ३७.६(२१.९), सांताक्रूझ ३१.३ (२४.५), डहाणू ३१.१ (२५.५),

रत्नागिरी ३१.१ (२१.१), छत्रपती संभाजीनगर ३४.७ (२०.६), नांदेड - (२२.६), परभणी ३८.२ (२२.९), अकोला ३८.९ (२४.२), अमरावती ३९.८(२४.२), बुलढाणा ३६.४ (२०.४), ब्रह्मपूरी ४०.२ (२३.५),

चंद्रपूर ३८.८ (२४.२), गडचिरोली ३५.८(१९.६), गोंदिया ३७.२ (२३.२), नागपूर ३९.० (२३.६), वर्धा ४०.२(२४.०), वाशीम ३९.२ (२०.६), यवतमाळ ३९.० (२२.५).

शनिवारी (ता.१) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT