Team Agrowon
राज्यात पुढील विविध भागात शनिवार (ता. १८) वादळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आला.
तसेच विदर्भात आज शुक्रवार (ता.१७) विजा, वादळी वारे आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला.
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शुक्रवारी (ता.१६) संध्याकाळी मराठवाडा आणि विदर्भाच्या वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड जिल्ह्यात वादळी गारपीटीचा जबर तडाखा बसला.
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा पावसामुळे मुदखेड शिवारात केळी बागा आडव्या पडल्या आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे धनज बु येथे गुरुवारी दुपारी वीज पडून शेतकरी माधव काळबा शिंदे यांचा एक बैल मयत झाला असल्याचा प्राथमिक अहवाल तहसिलदार लोहा यांनी दिलेला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अंजनवाडा ( ता.औंढा नागनाथ) शिवारात गव्हाच्या सुडी पावसाने भिजु नये म्हणुन झाकतांना शेतकरी महिला