Rain Agrowon
हवामान

Vidarbha Rain: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढत असून विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे व विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला येथे तापमान ४३ अंशांवर पोहोचले असून, इतर अनेक जिल्ह्यांतही उष्णतेचा झळा जाणवत आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाला पोषक हवामान असले तरी राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढत आहे. आज (ता. १६) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.

दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही प्रणाली पोषक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह वादळी पाऊस हजेरी लावत आहे.

मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे आणि सोलापूर येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, जळगाव, जेऊर, परभणी, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने उकाडा आणि झळा तापदायक ठरत आहेत.

आज (ता. १६) विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. १५) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३९.२---१९.६

अहिल्यानगर---३८.८---२३.४

धुळे---४२.२---१८.४

जळगाव---४१.५---२४.५

जेऊर---४१.०---२०.०

कोल्हापूर---३९.६---२३.२

महाबळेश्वर---३३.६---२०.४

मालेगाव---४०.८---२५.६

नाशिक---३८.१---२२.८

निफाड---३८.७---२०.०

सांगली---३९.८---२३.५

सातारा---३९.६---२२.०

सोलापूर---४२.२---२५.०

सांताक्रूझ---३६.८---२४.५

डहाणू---३६.३---२३.५

रत्नागिरी---३४.८---२२.२

छत्रपती संभाजीनगर---४०.८---२५.६

धाराशिव---३९.९---२२.०

परभणी---४१.६---२६.०

परभणी (कृषी)---४०.५---२१.६

अकोला---४३.०---२८.६

अमरावती---४१.४---२४.१

भंडारा---३७.२---२५.०

बुलडाणा---३९.२---२७.२

चंद्रपूर---४१.८---निरंक

गडचिरोली---४१.०---२२.०

गोंदिया---३७.६---२२.२

नागपूर---३९.८---२४.४

वर्धा---३९.८---२४.४

वाशीम---४१.८---निरंक

यवतमाळ---४१.४---२६.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२२.०---४३.०

मराठवाडा---२१.६---४१.६

पश्‍चिम महाराष्ट्र---१९.६---४२.२

उत्तर महाराष्ट्र---१८.४---४२.२

कोकण---२२.२---३६.८

४२ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४३, धुळे ४२.२, सोलापूर ४२.२.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT