Rain Forecast Agrowon
हवामान

Weather Update Maharashtra: राज्यात वादळी पावसाचा इशारा; 'येलो'सह 'ऑरेंज' अलर्टचा इशारा 

IMD Alert: राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. तसेच राज्यात आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, वीजांसह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला.

Dhananjay Sanap

Pune News: राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. तसेच राज्यात आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, वीजांसह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला. तर १७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजा, वादळी वारे, हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भातील भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट, विजांसह ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

तसेच नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बीड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, ठाणे पालघर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, वीजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने जारी केला आहे.

तर उर्वरित राज्यात सोलापूर आणि सांगली वगळता सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाची आहे. राज्यात मागील चोवीस तासात बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ४० च्या पार होता. विदर्भातील वाशिम जिल्ह्यात उच्चांकी कमाल ४२.८ अंश तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे ४२.४ अंश, तर परभणी, सोलापूर, अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० च्या पार होता. मध्य प्रदेश, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील चार दिवस राज्यातील  विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT