Rain Agrowon
हवामान

Rain News Updates: पुढील तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा

पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये वादळी वारे, विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

१९ मार्चपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये अनेक भागांत वादळी वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.

तसेच विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज (ता. १७) अनेक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने उत्तर भारतातही १९ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज सांगितला आहे.

पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये वादळी वारे, विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 

या अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वारे, गारपीटीमुळे रब्बीचा हंगाम अडचणीत आला आहे.

शेतातील उभ्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

राज्यात गहू, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तर उत्तर भारतात काढणीला आलेल्या गव्हाला मोठा फटका बसण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास प्रतिकूल हवामानामुळे हिरावून घेतला जाणार आहे.

दरम्यान, राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्यांनी तातडीने विमा भरपाईसाठी पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Law Reform: बनावट बियाण्यांवर नियंत्रणासाठी बीज कायद्यात बदलाची गरज: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Agriculture Department Protest: आकृतिबंधाविरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार

China Soybean Oil Exports: चीनमधून भारतात सोयातेलाची उच्चांकी निर्यात

Cotton Import: कापूस आयातीला मुदतवाढीची मागणी

Maharashtra Monsoon: राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT