Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे थंडी ओसरली आहे. आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे थंडी ओसरली आहे. आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, रविवारी (ता. ७) राजस्थान मधील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात मात्र थंडी ओसरली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १५ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ८) राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या पोषक स्थितीमुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे येथे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.५ (१५.०), धुळे २६.० (११.२), जळगाव २७.० (१२.४), कोल्हापूर २९.९ (२०.५), महाबळेश्वर २५.६ (१५.०), नाशिक २६.४ (१६.९), निफाड २६.० (१५.४), सांगली ३०.३ (२०.३), सातारा ३०.९ (१७.२), सोलापूर ३२.२(२०.१), सांताक्रूझ ३१.५ (२०.९), डहाणू २७.८ (१९.४), रत्नागिरी ३२.१ (२१.२),

छत्रपती संभाजीनगर २७.२ (१४.८), नांदेड २९.६ (१६.६), परभणी २८.७ (१४.४), अकोला २९.० (१७.६), अमरावती २८.० (१५.६), बुलढाणा २७.५ (१६.७), ब्रह्मपूरी २७.२ (१५.९), चंद्रपूर २७.० (१४.४), गडचिरोली २९.० (१४.८), गोंदिया २४.८ (१३.८), नागपूर २५.६(१६.६), वर्धा २६.८(१५.६), वाशीम २८.६ (१७.२), यवतमाळ २९.० (१५.५).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे.

विजांसह पावसाची शक्यता :

सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT