Rain Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Rain Update: राज्यात वादळी पावसाचा इशारा देत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून तापमानात मोठी घट झाल्याने उकाडा कमी झाला आहे.

अमोल कुटे

Pune News: वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा कमी झाला आहे. आज (ता. ९) मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तापमानातील चढ-उतार होण्याची राहण्याची शक्यता आहे.

पश्‍चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आगमनास पोषक वातावरण असल्याने १३ मे पर्यंत मॉन्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचे संकेत आहेत.

ओडिशातील संबलपूर येथे देशातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर आणि पुणे जिल्ह्यात तसेच विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎मराठवाड्यातील धाराशिव व विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश तापमानाची नोंद झाली. ‎‎यवतमाळ आणि चंद्रपूर येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎‎जेऊर, ‎सोलापूर, अमरावती, गडचिरोली, ‎नागपूर आणि ‎वर्धा येथे ३८ अंशांपेक्षा अधिक, तर ‎सांगली, परभणी (कृषी), ‎‎भंडारा, ‎गोंदिया आणि ‎वाशीम येथे ३७ अंश तापमानाची नोंद झाली. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात मोठी घट दिसून आली आहे.

‎आज (ता. ९) मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर, तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३३.७---२२.३

‎‎धुळे---३०.०---१८.४

‎जळगाव---३३.४---१९.३

‎जेऊर---३८.५---१९.०

‎कोल्हापूर---३५.४---२३.४

‎महाबळेश्‍वर---३०.७---१६.०

‎मालेगाव---३०.०---२१.६

‎नाशिक---२८.३---२०.०

‎निफाड---३०.०---१८.७

‎सांगली---३७.३---२३.०

‎सातारा---३५.४---२४.०

‎सोलापूर---३८.७---२४.८

‎सांताक्रूझ---३३.८---२०.६

डहाणू---३१.१---२१.०

‎रत्नागिरी---३४.४---२३.१

‎छत्रपती संभाजीनगर---३४.५---२३.०

‎धाराशिव---४०.०---२२.०

‎परभणी---३६.९---२२.५

‎परभणी (कृषी)---३७.६---१९.०

‎अकोला---३६.६---२२.६

अमरावती---३८.२---२०.८

‎‎भंडारा---३७.०---२२.०

‎बुलडाणा---३४.२---२२.२

ब्रह्मपुरी---४०.०---२३.९

‎चंद्रपूर---३९.४---२६.४

‎गडचिरोली---३८.२---२४.०

‎गोंदिया---३७.०---२३.२

‎नागपूर---३८.७---२३.२

‎वर्धा---३८.०---२४.६

‎वाशीम---३७.४---निरंक

‎यवतमाळ---३९.६---२४.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२०.८---४०.०

‎मराठवाडा---१९.०---४०.०

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१६.०---३८.७

‎उत्तर महाराष्ट्र---१८.४---३३.४

‎कोकण---२१.०---३४.४

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

३९ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎धाराशिव ४०, ब्रह्मपुरी ४०, ‎यवतमाळ ३९.६, चंद्रपूर ३९.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT