Hailstorm  Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

Hailstorm Update : राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. रविवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ५ अंश तर सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली. यातच आज (ता. २६) विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड, धुळ्यासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. निफाड येथे पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याने हुडहुडी वाढली आहे.

तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, नाशिक येथे तापमान ११ अंशांच्या खाली आला आहे. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशाच्या पुढे असल्याने दुपारी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असली तरी मराठवाड्यापासून विदर्भ, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत खंडीत वाऱ्यांची स्थिती विरली आहे. छत्तीसगडपासून विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे.

आज (ता. २६) विदर्भात वादळी पावसाची शक्यता असून, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपिट होण्याचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा 'यलो अलर्ट' तर उर्वरित मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.६ (१०.९), धुळे ३२.० (९.२), जळगाव ३१.८ (१२.०), कोल्हापूर ३४.१ (१८.१), महाबळेश्वर २८.८ (१४.४), मालेगाव ३२.८ (१५.०), नाशिक ३०.३ (१०.२), निफाड २८.८ (५.०), सांगली ३४.६ (१७.२), सातारा ३४.७ (१४.५), सोलापूर ३६.० (१९.६), सांताक्रूझ ३२.७ (१५.०), डहाणू २८.१ (१९.०), रत्नागिरी ३१.५ (१६.८),

छत्रपती संभाजीनगर ३१.६ (१५.७), नांदेड ३३.२ (१७.९), परभणी ३३.४ (१६.१), अकोला ३४.१ (१५.८), अमरावती ३२.६ (१६.३), बुलढाणा ३१.३ (१६.०), चंद्रपूर ३३.२ (१७.४), गडचिरोली ३२.० (१६.६), गोंदिया ३१.८ (१७.२), नागपूर ३१.८(१८.०), वर्धा ३४.०(१४.६), वाशीम ३४.० (१४.६), यवतमाळ ३४.० (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT