Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

Maharashtra Rain Alert : राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १८) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तसेच उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील पावसाने (Rain) कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.९ अंश तापमानाची नोंद झाली.

अकोला, चंद्रपूर येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार शक्य आहे. आज (ता. १८) राज्यात सर्वच विभागांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह, पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.४, जळगाव ३४.२, कोल्हापूर २९.१, महाबळेश्वर २४.५, नाशिक ३२.३, निफाड ३२.५, सांगली ३०.३, सातारा ३१, सोलापूर ३२.५, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३२.४, छत्रपती संभाजीनगर ३२.८, बीड ३२, धाराशिव ३०.९, परभणी ३३.७, अकोला ३५.९, अमरावती ३४.८, भंडारा ३०.६, बुलडाणा ३२, ब्रह्मपुरी ३६.९, चंद्रपूर ३५.८, गडचिरोली ३४.६, गोंदिया ३३.८, नागपूर ३४.१, वर्धा ३४.२, वाशीम ३४, यवतमाळ ३३.२.

कमी दाब क्षेत्र जमिनीवर

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी क्षेत्र (डिप्रेशन) जमिनीवर आले आहे. दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तमिळनाडू परिसरांवर येताच या प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.

यातच उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर रविवारपर्यंत (ता. २०) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत (ता.२२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT