Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert: वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा

Weather Update: हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अमोल कुटे

Pune News: उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्रात आता वादळी पावसाची शक्यता आहे. आज (ता. २७) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎तेलंगणपासून रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात उन्हाच्या चटक्याने जमीन करपून निघत आहे. उकाड्याने घामाच्या धारा देखील तापदायक ठरत आहेत. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात मायणी (ता. खटाव) येथे गारांचा पाऊस झाला.

‎‎शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ‎अकोला आणि चंद्रपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, अमरावती, परभणी, ‎यवतमाळ, ‎वर्धा आणि नागपूर येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, ‎‎‎मालेगाव, ‎जळगाव, ‎‎धुळे, ‎‎गडचिरोली आणि वाशीम येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा ४० अंशांच्या पार आहे.

‎‎आज (ता. २७) यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली येथे उष्ण हवामानाची शक्यता आहे. ‎तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा ( येलो अलर्ट) : जालना, बीड, परभणी, हिंगोली.

गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाची शक्यता ( येलो अलर्ट) : कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया.

‎४४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ‎ब्रह्मपुरी ४५.५, ‎चंद्रपूर ४५.४, ‎अकोला ४५.१, अमरावती ४४.६, परभणी ४४.४, ‎यवतमाळ ४४.४, ‎वर्धा ४४.१, नागपूर ४४.

‎शनिवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

शहर कमाल किमान

पुणे ४०.२ २२.७

‎‎धुळे ४३.० २०.०

‎जळगाव ४३.१ २५.४

‎जेऊर ४२.० २२.०

‎कोल्हापूर ३२.१ २२.५

‎महाबळेश्वर ३१.९ २०.०

‎मालेगाव ४३.२ २५.८

‎नाशिक ३९.० २३.२

‎निफाड ३९.९ १९.०

‎सांगली ३५.० २२.०

‎सातारा ३९.२ २४.०

‎सोलापूर ४२.१ २५.६

‎सांताक्रूझ ३३.४ २६.४

‎डहाणू ३४.८ २५.०

‎रत्नागिरी ३३.४ २५.३

‎छत्रपती संभाजीनगर ४२.४ २६.०

धाराशिव ४२.२ २२.२

‎परभणी ४४.४ २७.८

‎परभणी (कृषी) ४३.२ २६.९

‎अकोला ४५.१ २९.५

‎अमरावती ४४.६ २६.३

‎भंडारा ४२.६ २६.४

‎बुलडाणा ४०.६ २७.०

‎ब्रह्मपुरी ४५.५ २६.८

चंद्रपूर ४५.४ निरंक

‎गडचिरोली ४३.२ २४.६

‎गोंदिया ४२.६ २७.०

‎नागपूर ४४.० २७.५

‎वर्धा ४४.१ २८.९

‎वाशीम ४३.४ निरंक

‎यवतमाळ ४४.४ २८.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT