Monsoon Agrowon
हवामान

Return Monsoon : माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु; राज्यात काही भागात पावसाचा अंदाज 

Monsoon Update : राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : तब्बल एक आठवडा एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर माॅन्सून आज आणखी काही भागातून काढता पाय घेतला. तर राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज उत्तर भारतातील काही भागातून आपला मुक्काम हलविला. माॅन्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर २३ आणि २४ सप्टेंबरला काही भागातून काढता पाय घेतला होता. मात्र त्यानंतर माॅन्सून एकाच जागेवर खिळून होता. पण तब्बल ७ दिवसांनंतर आज माॅन्सूनने मोठी चाल केली. 

माॅन्सूनने आज जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्लीच्या सर्व भागातून माघार घेतली. तर उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या आणखी काही भागातून माॅन्सून माघारी फिरला आहे. सध्या माॅन्सूनच्या परतीची सिमा लखिमपूर खेरी, शिवपुरी, कोटा, उदयपू, दिसा, सुरेंद्रनगर आणि जुनागड दरम्यान होती. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धारशिव, लातूल, बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर रायगड, नगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या आणि शुक्रवारी राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT