Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाचा मुहूर्त गेले काही वर्षे सातत्याने लांबल्याचे दिसून आले आहे. यंदा देखील मॉन्सूनने राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तराखंडसह वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती नाही. वायव्य भारतात पावसाने उघडीप दिल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी २५ सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.

वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते.

यापूर्वी १ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख होती. हवामान विभागाने २०२० मध्ये मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक जारी केले. मॉन्सून परतीची लांबणारी वाटचाल लक्षात घेता, १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र सध्या राजस्थानसह वायव्य भारतामध्ये वातावरणात बाष्प अस्तित्वात असून, हलक्या स्वरूपात पाऊस सुरू आहे. परिणामी, मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने यापूर्वीच जाहीर केले होते.

यंदाच्या हंगामात मॉन्सूनने केरळमध्ये ३० मे रोजी हजेरी लावली. १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभाव पडला. बंगालच्या उपसागरातील वाटचाल मंदावली असतानाच अरबी समुद्रातून प्रगती करत ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर मजल दरमजल प्रवास करून मोसमी वारे २ जुलै रोजी संपूर्ण देशात दाखल झाले. यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे.

गतवर्षी २५ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातमधून परतीचा प्रवासाला सुरुवात केली. वायव्य भारतातून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्रातून मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरू होण्यास ६ ऑक्टोबरचा दिवस उजाडावा लागला. परतीची वाटचाल वेगाने झाल्याने दुसऱ्याच दिवशी ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. तर १९ ऑक्टोबर रोजी मॉन्सून वारे संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT