Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: थंडीच्या लाटेचे गूढ! महाराष्ट्रात अचानक तापमान घसरले

Climate Change: उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये अचानक थंडी वाढली आहे. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, हा बदल वारा वहन प्रणालीतील बदलांमुळे झाला आहे.

Team Agrowon

माणिकराव खुळे

Maharashtra Heatwave: संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नाशिक, नगर उत्तर यासह महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत बुधवारपासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली. महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे नगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत सकाळच्या वेळी थंडीच्या लाटेची स्थिती जाणवू लागली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. हे वातावरण शनिवार (ता. ८)पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मात्र अशी स्थिती नाही. तेथे पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा काही ठिकाणी सरासरीपेक्षा काहीसे अधिक तर काही ठिकाणी किंचितसे कमी आहे.

कमाल तापमानाची स्थिती

संपूर्ण विदर्भ, नगर, जळगाव वगळता उर्वरित २३ जिल्ह्यांत दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने, तर मुंबईसह कोकणात ४ ते ५ अंश सेल्सिअस वाढ झालेली जाणवत आहे.

उष्णतेच्या लाटेची शक्यता

मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्ण व दमट वातावरणात जाणवत आलेला रात्रीचा उकाडा शनिवारपर्यंत राहण्याची शक्यता जाणवते. रविवार, सोमवार उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.

थंडी अचानक वाढण्याची कारण

बुधवारपासून (ता. ५) उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नाशिक, नगर उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांत आल्याने एकाकी थंडीत वाढ होताना दिसत आहे.

गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते काल बुधवार पर्यंत बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेने दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसुरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा होत होता. हा अडथळा वारा वहन प्रणालीतील बदलातून जाणवत आहे.

हवामानाचे हंगाम

होळीपासून मोठा होत जाणारा दिवस आणि वाढती उष्णता ही वातावरणीय घडामोडीमुळे होते.

पृथ्वी तिच्या मूळ अक्षापासून साडेतेवीस अंशांनी पूर्वेकडे कलल्यामुळे तिचा स्वतःभोवती फिरणारा काल्पनिक रेषा असणारा अक्ष तिरपा असल्यासारखा जाणवतो.

चोवीस तासांत पृथ्वी स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करते, त्यामुळे दिवस व रात्र घडून येते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता-फिरता, सूर्याभोवती ही एक लंबवर्तुळकार (अंडाकृती) मार्गक्रमण करून ३६५ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे वर्षभरात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे हंगाम घडून येतात.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील आपल्या देशाच्या मध्यावरून म्हणजे साडेतेवीस अंश उत्तर अंशावरून जाणारे अक्षवृत्त म्हणजे कर्क वृत्त आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील दक्षिण अमेरिकेच्या पॅराग्वे प्रांताच्या मध्यावरून म्हणजे साडेतेवीस अंश दक्षिण अंशावरून जाणारे अक्षवृत्त म्हणजे मकर वृत्त होय. पृथ्वीच्या परिभ्रमणातून या दोन अक्षवृत्तादरम्यानचे पृथ्वीचे परीक्षेत्र सूर्यासमोर येते. त्यामुळेच पृथ्वीवर हवामानाचे ऋतू व हंगाम घडून येतात.

डिसेंबर २१/२२ ला मकर वृत्ताचा भाग सूर्यासमोर असतो आणि कर्क वृत्तावरील म्हणजे आपल्या देशाचा भूभाग सूर्यापासून सर्वांत दूर असल्यामुळे सूर्याची किरणे तिरपी पोहोचतात. सूर्याच्या कमी उष्णतेमुळे तेव्हा थंडीचा हंगाम आपण अनुभवतो.

दुसऱ्या दिवसापासून म्हणजे २३ डिसेंबरनंतर पृथ्वीचा कर्क वृत्तवरील म्हणजे आपल्या देशाचा भूभाग प्रत्येक दिवसागणिक सूर्यासमोर येण्याचे संक्रमण चालू होते. त्यामुळे रात्र हळूहळू लहान होऊन पुढील ९० दिवसांत म्हणजे मार्च २१/२२ ला दिवस आणि रात्र समान तासांची होते. २३ मार्चनंतर दिवस मोठा तर रात्र लहान होत जाते. म्हणजेच थंडावा कमी होऊन उष्णता वाढते.

होळी हा सण मार्च महिन्याच्या मध्यावर येतो. त्यामुळेच शेतकरी सोयीने तिथी लक्षात यावी म्हणून, होळीपासून दिवस मोठा होत जाणार आणि थंडी होळीच्या अग्नीत विलीन होणार असे म्हणतात.

माणिकराव खुळे ९४२३२१७४९५

(ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT