Monsoon Agrowon
हवामान

Return Monsoon : माॅन्सूनने घेतला देशाचा निरोप; राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Monsoon Update : राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने देशाचा अखेर आज निरोप घेतला. तर दक्षिण द्वीपकल्पात ईशान्य माॅन्सून सक्रिया झाला आहे. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनने आज देशाचा निरोप घेतला. माॅन्सून संपूर्ण देशातून बाहेर निघाला. माॅन्सूनने यंदा आपल्या सरासरी वेळेच्या तुलनेत उशीरा परतीचा प्रवास सुरु केला. माॅन्सून यंदा २३ सप्टेंबर रोजी परतीवर निघाला होता. त्यानंतर प्रवासात अनेक दिवसांचे मुक्काम करत अखेर आज माॅन्सूनने देशाचा निरोप घेतला. माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा सुरु झाला तरी माॅन्सूनने वेळेत देशाचा निरोप घेतला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात माॅन्सूनने देशाचा निरोप घेतल्यानंतर आज दक्षिण द्विपकल्पात ईशान्य माॅन्सून सक्रिय झाला.

हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT