Dana Cyclone Agrowon
हवामान

Rain Update : 'डाना' चक्रीवादळाचा जमिनीवरील प्रवास सुरू; राज्यात रविवारपासून पाऊस? 

Weather Forecast : बंगालच्या उपसागरावरील डाना चक्रीवादळाने आज दुपारी १ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी जवळच्या धामरा आणि भितरनिका बेटांना ओलांडलं आहे.

Dhananjay Sanap

Pune News : बंगालच्या उपसागरावरील डाना चक्रीवादळाने आज दुपारी १ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी जवळच्या धामरा आणि भितरनिका बेटांना ओलांडलं आहे. आता चक्रीवादळाचा जमिनीवरील प्रवास सुरू आहे. डानाने उपसागरावरील वाटचाल प्रतिताशी १०० ते ११० किलोमीटर इतक्या वेगाने केली.

डाना चक्रीवादळाचा जमिनीवरील प्रतिताशी वेग ७५ ते ८५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. पुढील काही तासात डानाची तीव्रता कमी होईल. पुढील ६ तासांमध्ये चक्रीवादळाचं डीप डिप्रेशन तयार होईल. परिणामी ओडिशाची किनारपट्टी, पश्चिम बंगालच्या दक्षिण गंगेच्या भागात काही ठिकाणी अति मुसाळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात मात्र डानाचा परिणाम जाणवणार नाही.

राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवस प्रामुख्याने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रविवारपासून काही भागात पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

रविवारी विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, नागपुर, वर्धा तसेच सोमवारी जळगाव, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  अमरावती, भंडारा, चंद्रपुर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

तसेच मंगळवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाटमाथा, कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाटमाथा, सातारा आणि साताराच्या घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला,  अमरावती,  वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे आणि विजासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT