Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यातील पावसाचा जोर ओसरला

Maharashtra Monsoon News : पूरस्थिती नियंत्रणात; जनजीवन पूर्वपदावर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Maharashtra Weather Update : पुणे : कोकण, घाटमाथा, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, विदर्भातील काही भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते. कोल्हापुरातील पंचगंगा, खेडमधील जगबुडी या दोन्ही नद्यांची पाणी पातळी अजूनही इशारा पातळीपेक्षा वर आहे. मात्र, शुक्रवारपासून (ता. २८) पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगा, वाशिष्टी, सावित्री, पातळगंगा, अंबा, कुंडलिका, वैनगंगा अशा नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणांतील पाणी साठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. कळमोडी, चासकमान, खडकवासला, राधानगरी, वारणा अशी काही धरणे भरली आहेत. सध्या पावसाचा काहीसा जोर कमी झाल्याने धरणांतील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळी घटली आहे.

मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर भागात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. मात्र, नांदेड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांत काही ठिकाणी मागील आठवडाभर झालेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने या शेतातील पाणी ओसरू लागले आहे. ओढ्याची आणि नद्यांची पाणी पातळी स्थिर झाली असून धरणांत आवक कमी झाली आहे.
विदर्भातही यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वाशीम, अमरावती या भागात पावसाने चांगलेच तांडव केले होते. त्यामुळे ऊर्ध्व वर्धा, बेंबळा, अरुणावती, गोसी खुर्द, इरई, निम्न वर्धा या धरणांतील पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने काही प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. सध्या विदर्भात पाऊस नसल्याने धरणांतील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी स्थिर आहे. शेतांतील पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे शेतातील कामे पुन्हा सुरू होण्यास सुरूवात झाली आहे.

शनिवारी (ता.२९) सकाळी आठपर्यंत राज्यात मंडळनिहाय झालेला पाऊस (मि.मी) : स्त्रोत - कृषी विभाग
ठाणे, बलकुम, मुंब्रा ८७.८, दहिसर, बेलापूर, कल्याण, ९६.५, देहरी ६७८.८, खर्डी ९५.३, किन्हवली ८८.५, वशींद ९४, डोलखांब ८८.५, गोरेगाव ८८, बदलापूर ८८, पनवेल, ओवले, करनाळा ७१, तलोजे ९६.५, नेरळ ९२, कडाव ७५, कळंब ८१.५, कशेले ७५, महाड ७८.५, करंजवडी ८४.३, नाटे ७१.३, तुडील ७८.५, माणगाव ७७, गोरेगाव ७५, लोनेरे ६६.५, निजामपूर ७०.८, पोलादपूर, कोंडवी, वाकण ८४.३, म्हसळा ८४, खामगाव ७७, तळा ६६, कुळवंडी ७१.५, भरणे ७३.८, अगशी ७५.८, वाडा, कोणे, कांचगड, मनवर ७५, विक्रमगड ८३.३, तलवड ८८.५.

मध्य महाराष्ट्र ः त्र्यंबकेश्‍वर ३७.८, वेळुंजे ३२, माले ३८.३, निगुडगर ३६.८, कार्ला ४२.३, लोणावळा ६२.८, वेल्हा ७६.३, आंबेगाव ९८.५, परळी ३३, हेळवाक, मोरगिरी ७४, आंबा ३२, चंदगड ३४.८.

विदर्भ : कुदवा २६.८, आमगाव २२.५, सालेकसा ३७.५, देवरी ३०.८, कवाराबंध २२.५, चिंचगड २४.५, सिंदीबिरी ३०.८, चार्मोशी ३२.५, कुनपाडा ३६.३, घोट ५७, येनापूर ३२.५, भेंडाळा २५.३, अल्लापल्ली ३०, पेरामिल्ली ६७.३, एटापल्ली ९२.८, जरावंडी ६६, गत्ता ३५.५, पेंढरी ३६.८, मुलचेरा ४७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT