Summer Heat Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: राज्यात वाढणार उन्हाचा चटका

Maharashtra Weather Update: राज्यात वादळी पावसाचे ढग हटत असल्याने उन्हाचा चटका पुन्हा जाणवणार आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यावरील वादळी पावसाचे ढग निवळणार असल्याने कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. आज (ता. ६) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वारे वाहत असून, उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान कायम आहे. शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र काही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानसह उकाडा कायम आहे.

शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळ, धुळे, मालेगाव आणि अमरावती येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होऊ झाल्याने झळा वाढल्या आहेत. आज (ता. ६) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)

कोकण : खालापूर २०, पेण, माथेरान, सुधागड पाली, कर्जत प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा ३०.

शनिवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.२---१७.४

अहिल्यानगर---निरंक---१८.५

धुळे---३८.५---१७.०

जळगाव---३७.८---२१.५

जेऊर---३७.०---१९.०

कोल्हापूर---३४.३---२३.६

महाबळेश्वर---२८.५---१८.०

मालेगाव---३८.०---२१.४

नाशिक---३७.५---१७.६

निफाड---३६.६---१५.०

सांगली---३५.४---२२.६

सातारा---३५.७---२०.०

सोलापूर---३७.४---२५.१

सांताक्रूझ---३३.७---२३.७

डहाणू---३४.२---२१.४

रत्नागिरी---३३.७---२४.७

छत्रपती संभाजीनगर---३६.८---१९.८

धाराशिव---३६.८---२१.६

परभणी---३५.६---२२.४

परभणी (कृषी)---३४.८---२०.२

अकोला---३९.०---२१.४

अमरावती---३८.०---२१.९

भंडारा---३६.०---१९.०

बुलडाणा---३५.०---२४.५

ब्रह्मपुरी---३५.७---२२.६

चंद्रपूर---३३.२---२०.८

गडचिरोली---३३.२---२०.८

गोंदिया---३६.२---२०.६

नागपूर---३७.४---२०.३

वर्धा---३६.२---२२.२

वाशीम---३७.२---निरंक

यवतमाळ---३८.६---२५.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१९.०---३९.०

मराठवाडा---१९.८---३६.८

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.४---३७.४

उत्तर महाराष्ट्र---१५.०---३८.५

कोकण---२१.४---३४.२

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

३८ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ३९, यवतमाळ ३८.६, धुळे ३८.५, मालेगाव ३८, अमरावती ३८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT