Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Weather Update : पुढील पाचही दिवस देशातील आणि राज्यातील बहुतांशी भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : देशात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच आहे. काल रायलसिमा भागातील नांदयाल येथे सर्वाधिक ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर पुढील पाचही दिवस देशातील आणि राज्यातील बहुतांशी भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा आणि तापमानात वाढ होण्याचा अंदाज दिला. आज आंध्र प्रदेशातील किनारी भाग आणि तेलंगणा तसेच रायलसिमा भागात ४४ ते ४७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे.

तसेच पश्चिम बंगालमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारी भाग, रायलसिमा, झारखंड, तमिळनाडूमधील काही भागात पुढील ३ दिवस उष्मतेची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ४ आणि ५ मे रोजी काही भागात उष्णतेची लाट राहील, असा अंदाज दिला. 

राज्याचा विचार करता पुढील तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे.

तर उद्या आणि परवा सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. रविवारी बीड जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT