Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : ऊन वाढायला सुरुवात; उत्तर भारतातील काही भागात पावसाचा इशारा

Weather Update : देशातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली. तर अनेक ठिकाणी सकाळी गारठा जाणवत आहे. राज्यातही सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी परिस्थिती आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली. तर अनेक ठिकाणी सकाळी गारठा जाणवत आहे. राज्यातही सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी परिस्थिती आहे. 

उत्तर भारतातील बहुतांशी भागात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. ईशान्य भारतातील तापमानापेक्षा हे तापमान २ अंश सेल्सिअस ४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

राजस्थानमधील चुरु येथे जमिनीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. चूरू येथे ६.६ अंश सेल्सिअस तापमान होते. याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना आणि उत्तर राजस्थानमधील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तर ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील काही भागात पावसाचाही इशारा हवामान विभागाने दिला. राज्यातील अनेक भागात सकाळी वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. पण दुपारी उन्हाचा चटकाही असह्य होत आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील सरासरी तापमानात वाढ झाली. राज्यात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT