Pune Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. २३) पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) कायम आला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर अति जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून बनस्थली विद्यापीठ, गुना, दामोह, पेंद्रा रोड, मिदनापूर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे आहेत. मध्य भारतात समुद्र सपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे..बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. घाटमाथ्यावरील भिरा येथे राज्यातील सर्वाधिक ३०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Rain Update Today: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार; मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर.आज (ता. २३) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरींची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..बुधवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२७.७---२२.१अहिल्यानगर---२७.८---२२.९धुळे---३१.०---१९.८जळगाव---३०.०---२३जेऊर---२९.५---२२.०कोल्हापूर---२६.५---२१.९महाबळेश्वर---१९.५---१७.६मालेगाव---२९.०---२०.२.नाशिक---२६.५---२१.९निफाड---२८.५---२२.४सांगली---२८.८---२२.६सातारा---२५.१---२१.३सोलापूर---३०.१---२२.६सांताक्रूझ---३०.७---२४.४डहाणू---२९.८---२४.०रत्नागिरी---३०.५---२४.४छत्रपती संभाजीनगर---२७.४---२२.२.धाराशिव---३०.०---१९.०परभणी---२९.६---२२.२परभणी (कृषी)---२९.६---२१.६अकोला---२८.२---२३.९अमरावती---२५.८---२२.९ब्रह्मपूरी---२७.०---२१.२बुलडाणा---२६.६---२२.२चंद्रपूर---३४.०---२३.०.Maharashtra Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा.गडचिरोली---२६.२---२४.०गोंदिया---निरंक---२१.४नागपूर---२६.४---२२.०वर्धा---३६.२---२३.४वाशीम---३२.०---२०.४यवतमाळ---२७.८---१७.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१९.८---३१.०पश्चिम महाराष्ट्र---१६.७---३०.१कोकण---२४.०---३०.७मराठवाडा---१९.०---३०.०विदर्भ---१७.२---३६.२.मुसळधार पावसाची शक्यता (रेड अलर्ट) :पुणे घाटमाथा.अतिजोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) :पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.