Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : राजस्थानातील फालोदी शहराचे तापमान पन्नाशीपार

Temperature Update : सूर्याची तप्त किरणे जमीन भाजून काढत असल्याने राजस्थानातील फालोदी हे देशातील उष्ण शहर ठरले असून, तेथे आतापर्यंतच्या उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Pune News : सूर्याची तप्त किरणे जमीन भाजून काढत असल्याने राजस्थानातील फालोदी हे देशातील उष्ण शहर ठरले असून, तेथे आतापर्यंतच्या उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात चटका अधिक तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे. आज (ता. २७) विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील फालोदी येथे देशातील सर्वोच्च ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात तापमानाचे अर्ध शतक गाठणारे फालोदी हे जगातील दुसरे सर्वांत उष्ण शहर ठरले आहे. पाकिस्तानातील जोकोबाबाद हे ५०.५ अंश तापमानासह पहिल्या क्रमांकाचे उष्ण शहर असल्याचे ‘अलडोरॅडो वेदर’ या जागतिक संकेतस्थळाच्या नोंदीनुसार स्पष्ट होत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये फालोदी येथे सर्वोच्च ४९ अंश तापमानाची नोंद झाली होती. दुसऱ्याच दिवशी तापमानाने पन्नाशी गाठली आहे. यापूर्वी २२ मे १९९८ रोजी तेथे सर्वोच्च ४८.८ अंश तापमानाची नोंद आहे. बारमेर (४८.८), बिकानेर (४८.२), जैसलमेर (४८) या शहरांचा पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये समावेश आहे.

सूर्याचा प्रकोप कायम असल्याने रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळ व परभणी येथे ४५ अंश तर ब्रह्मपुरी, अमरावती, वर्धा येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २७) विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा कायम असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे.

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३५.९, धुळे ४२, जळगाव ४३.८, कोल्हापूर ३२.७, महाबळेश्वर २६.१, नाशिक ३७.३, निफाड ३७.९, सांगली ३२.१, सातारा ३२.६, सोलापूर ३८.२, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३५.४, रत्नागिरी ३२.४, छत्रपती संभाजीनगर ४२.८, नांदेड ४३.८, परभणी ४५.२, अकोला ४५.६, अमरावती ४४.४, भंडारा ४०.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४४, चंद्रपूर ४३.४, गडचिरोली ४१.४, गोंदिया ४०.२, नागपूर ४१.७, वर्धा ४४, वाशीम ४३.८, यवतमाळ ४५.५.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, अकोला, चंद्रपूर.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४५.६, यवतमाळ ४५.५, परभणी ४५.२, अमरावती ४४.४, ब्रह्मपुरी ४४, वर्धा ४४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: राज्याला गारपीट, अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Chhatrapati Sambhajinagar ZP Budget: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’चा ७.४३ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्प

Chhatrapati Sambhajinagar Politics: भाजपने मित्र म्हणत केसाने गळा कापला

Agri Success Story: कुटुंबाने उभारली यशाची गुढी

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

SCROLL FOR NEXT