Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांखालीच

Winter Update : राज्यात किमान तापमान कमी-अधिक होत असले तरी राज्यात गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात किमान तापमान कमी-अधिक होत असले तरी राज्यात गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडी कमी झाली असून, सोमवारी (ता. २५) राजस्थान येथील सिकार आणि अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागात किमान तापमान ६ ते १० अंशांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. सोमवारी (ता. २५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी धुळे ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, निफाड येथील गहू संशोधन केंद्र, आणि जळगाव येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. २६) राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.९ (११.७), धुळे ३१.५ (८.४), जळगाव ३१.१ (९.६), कोल्हापूर २९.२ (१६.४), महाबळेश्वर २७.१ (१४.९), नाशिक २९.७ (१२.५), निफाड २८.६ (८.७), सांगली ३०.० (१५.०), सातारा ३०.९ (१३.८), सोलापूर ३२.१(१६.४), सांताक्रूझ ३५.५ (१९.४), डहाणू ३१.० (१८.१), रत्नागिरी ३४.१ (२०.७),

छत्रपती संभाजीनगर २९.२ (१२.१), नांदेड - (१३.८), परभणी २९.१ (१३.४), अकोला ३१.३ (१३.५), अमरावती २९.६ (१३.३), बुलडाणा ३०.६ (१३.८), ब्रह्मपुरी ३०.८ (१३.६), चंद्रपूर २९.०(११.४), गडचिरोली २९.२ (१२.०), गोंदिया २८.० (१०.५), नागपूर २९.०(१३.७), वर्धा २९.०(१४.०), वाशीम ३०.८ (११.६), यवतमाळ ३०.५ (१२.२).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ८.४, निफाड ८.७, परभणी (कृषी) ९.५, जळगाव ९.६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: कथा पुतळा आक्का आणि विलास आबांची...

Interview with Manikrao Khule: परतीचा माॅन्सून पाऊस देईल का?

AI Technology: ‘साब, मेरी तो जिंदगी बदल जायेगी!’

Rose Crop Pest: गुलाबावर ब्लॅक वाइन थ्रीप्सची नोंद

Women Entrepreneurship: पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची दुनिया

SCROLL FOR NEXT