Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : उन्हाचा पारा पुन्हा चाळीशीपार; वादळी पावसाचा इशारा

Summer Heat : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला आहे. तर राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला आहे. तर राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. आज (ता. २७) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, पावसाला पोषक हवामान कायम आहे. आज (ता. २७) मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर, आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने चंद्रपूर, वाशीम, अकोला, वर्धा, जेऊर, धुळे, मालेगाव येथे पारा ४२ अंशांवर पोचला. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांवर आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.४, धुळे ४२.०, जळगाव ४२.७, जेऊर ४२.५, कोल्हापूर ३६.९, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ४२.०, नाशिक ३९.८, निफाड ३९.०, सांगली ३८.४, सातारा ३८.०, सोलापूर ४१.१, सांताक्रूझ ३४.९, डहाणू ३३.३, रत्नागिरी ३३.२,

छत्रपती संभाजीनगर ३८.४, बीड ४१.१, नांदेड ४०.८, परभणी ४०.७, अकोला ४२.०, अमरावती ४१.६, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४१.६, चंद्रपूर ४२.६, गडचिरोली ४०.०, गोंदिया ३८.०, नागपूर ४०.१, वर्धा ४२.०, वाशीम ४२.६, यवतमाळ ४०.०.

- उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

जळगाव ४२.७, चंद्रपूर ४२.६, वाशीम ४२.६, जेऊर ४२.५, धुळे ४२.०, मालेगाव ४२, अकोला ४२, वर्धा ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT