Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025: वादळी पावसाचे सावट कायम; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस तडाखा देण्याची शक्यता

Maharashtra Weather Alert: माॅन्सूनचा मुक्काम आजही कायम होता. पण पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनचा मुक्काम आजही कायम होता. पण पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने देण्यात आला.

माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. माॅन्सूनने २ दिवस त्याच भागात मुक्काम केला. मात्र माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून केरळ गाठेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. माॅन्सून पुढील २ दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये काही भागातही माॅन्सून दाखल होईल. बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पुढील २४ तासांत ही प्रणाली उत्तरेकडे सरकरण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. दरम्यान या प्रणालीपासून कोकण किनारपट्टीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, उत्तर तेलंगणा ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून जोरदार वारेही वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. खानेदशातही वादळी पावसाची शक्यता आहे, अस अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT