Weather Agrowon
हवामान

Vidarbha Heat : विदर्भात वादळी पाऊस, उष्णतेच्या लाटेचा इशाराच; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पावसाची शक्यता

Weather Update : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून राज्यातील काही भागात वादळी पावसाचाही अंदाज आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भ चांगलाच तापला असून अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून राज्यातील काही भागात वादळी पावसाचाही अंदाज आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

हवामान विभागाने आज पुणे, नगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव  जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. पुणे आणि लातूर वगळता यावेळी वादळी वारे आणि वाजांसह मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज आहे. 

तसेच उद्या आणि परवा म्हणजेच शुक्रवारी आणि शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर नांदडे जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला.  

विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील बुलडणा आणि अकोला जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली असून ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुलडाणा येथील तापमानात तब्बल ४.६ अंशाची वाढ झाली असून तापमान ४१ अंशावर पोचले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT