Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यावर वादळी पावसाचे सावट कायम

कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कमाल तापमानाचा पारा (Temperature) वाढत असल्याने उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट (Hailstorm) दणका कायम आहे.

आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) दिला आहे.

कमाल तापमानात वाढ होत असून, उन्हाच्या झळा असह्य ठरत आहेत. राज्यात उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर ब्रह्मपूरी, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे येथे तापमान ४१ अंशांवर होते. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३४ ते ४० अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

उत्तर अंतर्गत कर्नाटक पासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.

आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.१ (१९.२), जळगाव ४१.० (२६.३), धुळे ४१.० (१९.०), कोल्हापूर ३६.२ (२४.८), महाबळेश्वर ३१.१ (१८.४), नाशिक ३७.३ (१८.३),

निफाड ३९.२(१६.१), सांगली ३७.९ (२४.१), सातारा ३६.१ (२०.०), सोलापूर ४०.३ (२४.९), सांताक्रूझ ३४.१ (२५.४), डहाणू ३४.० (२२.८), रत्नागिरी ३३.९ (२४.४),

छत्रपती संभाजीनगर ३९.० (२३.४), नांदेड ३९.२ (२६.०), परभणी ३९.५ (२६.३), अकोला ४१.८ (२६.०), अमरावती ४१.४(२३.५), बुलढाणा ३७.५ (२५.६), ब्रह्मपूरी ४१.७ (२३.६),

चंद्रपूर ४१.६ (२४.८), गडचिरोली ३८.०(२२.६), गोंदिया ४०.८ (२२.०), नागपूर ३९.७ (२२.२), वर्धा ४१.६(२५.५), वाशीम ४०.२ (२५.८), यवतमाळ ४०.५ (२४.७).

मंगळवारी (ता.१८) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT