Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यातील थंडीचा कडाका कमीच; राज्यातील काही भागात सकाळी धुक्याची चादर

Maharashtra Winter Weather : राज्यातील बहुतांशी भागात आजही थंडी कमीच होती. ढगाळ हवामानामुळे राज्यातील गारठा कमी झालेला आहे. तसेच धुकेही पडत आहे. या कारणांमुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात आजही थंडी कमीच होती. ढगाळ हवामानामुळे राज्यातील गारठा कमी झालेला आहे. तसेच धुकेही पडत आहे. या कारणांमुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून अगदी काही ठिकाणीच हलक्या पावसाची काहीशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.

आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर भारतात ११० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी-अधिक होत आहे. तसेच उत्तरेकडील राज्यात दाट धुके अनुभवायला मिळत आहे.

या कारणांनी अनेक ठिकाणी किमान तापमानात चढ उतार दिसून येत आहे. आज काही ठिकाणी तापमान कमी होऊन पुन्हा गारठा वाढला होता. आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही अनेक ठिकाणी थंडी कमी जास्त होताना दिसत आहे. तसेच बऱ्याच भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. राज्यात सकाळी थंडी जाणवत असली तरी किमान तापमान वाढलेलेच आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमान होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १५ अंशांच्या पुढे गेले आहे. सर्वात जास्त तापमान मुंबईतील सांताक्रज येथे ३५.४ अंश सेल्सिअस होते.

आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून अगदी काही ठिकाणीच हलक्या पावसाची काहीशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. तर पुढील २ ते ३ दिवसांमध्ये राज्यातील किमान तापमानात आणखी वाढ होईल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT