Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचे पुन्हा आगमन होण्याचे संकेत; विजांसह पावसाचा इशारा

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच व्यक्त केला आहे.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update : राज्यात पोषक हवामान होत असल्याने पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १७) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हिमालयाच्या पायथ्याकडे असलेला मॉन्सूनचा आस उद्यापासून (ता. १८) त्याच्या सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

त्यांच्या प्रभावामुळे उद्या (ता. १८) उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वायव्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

सर्वसाधारण स्थितीत येणारा मॉन्सून आस, बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १७) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा आहे.

कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT