Maharashtra Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल; पुढील पाच दिवस कोरडे हवामान

Weather Forecast : पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने कोरड्या हवामानसह तापमानातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : मागील आठवड्याभरापासून राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे. पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. मागील चोवीस तासात नाशिकमध्ये नीचांकी १४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने कोरड्या हवामानसह तापमानातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व राजस्थान भागात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट झाली आहे. तर जम्मू, काश्मीर, लडाख, बाल्टीस्तान, मुजफ्फराबादम राजस्थान आणि गुजरात कमाल तापमानात जैसे थे आहे. राज्यात मात्र कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोरड्या हवामानामुळे शेती कामांना वेग आला आहे. काढणीला आलेल्या भुईमुग, नाचणी, भात पिकांची काढणी करावी. तसेच कलिंगड, मक्याची पेरणी करावी. कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करून पेरणी करावी. तसेच काढणीला आलेल्या कांदा पिकांची काढणी करावी. तर हरभरा, गहू पेरणी आणि पूर्व हंगामी ऊसाची लागवड सुरू ठेवावी. वेचणीस आलेल्या कापसाची वेचणी करावी, असा सल्ला राज्यातील विविध कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.   

मागील आठवड्यात पावसानं  राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. पुढील पाच दिवस कोरड्या हवामानसह तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT