Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Summer Heat: राज्यातील तापमानाचा पारा वाढतोय; सोलापुरात देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद

Heatwave in Maharashtra: राज्यात उन्हाची लाट पुन्हा तीव्र होत असून, सोलापुरात देशातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान ३८ अंशाच्या घरात पोहोचले आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा पारा पुन्हा वाढला. राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३८ अंशाच्या दरम्यान पोचले. तर सोलापूर येथे देशातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील सकाळचे किमान तापमानही वाढते आहे. राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

देशातील इतर भागातही तापमानाचा पारा चढला आहे. उत्तर भारतातील थंडीही गायब होत आहे. आज देशातील सर्वात कमी तापमान १०.३ अंशावर पोचले. पंजाबमधील अमृतसर येथे या तापमानाची नोंद झाली.

तर सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात होते. सोलापूर येथे हे तापमान नोंदले गेले. उत्तर भारतातील बहुतांशी ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. तसेच चंद्रपूर येथेही ३९ अंश सेल्सिस तापमानाची नोंद झाली. 

राज्यातील किमान तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर सर्वाधिक तापमान सोलापुरात होते.

विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. अकोला, ब्रम्हपुरी, जेऊर,मोहोळ, परभणी आणि सांगली येथे ३८ अंशापेक्षा अधिक तापमान होते. तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती तसेच बीड, कोल्हापूर, नांदेड, उदगीर येथे ३७ अंश तापमान होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT