Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather: उन्हाच्या झळा वाढल्या; राज्यात तापमानाचा पारा चढता

Highest Temperature in Maharashtra: राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून, सोलापूरमध्ये कमाल ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांपार पोचला आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत ११० ते १२० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत. सोमवारी (ता. १७) हरियानाच्या रोहतक येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २२ अंशांच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरसह मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे कमाल तापमान ३६ अंशांवर होते. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. १८) कमाल आणि किमान तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

-सोमवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : --- ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान पुणे---३५.८---१२.९ अहिल्यानगर---३५.०---११.६ धुळे---३५.०---११.० जळगाव---३४.७---१४.२ जेऊर---३६.५---१४.५ कोल्हापूर---३४.६---१९.५ महाबळेश्वर---३१.२---१७.१ मालेगाव---३३.२---१३.८ नाशिक---३४.१---१३.६ निफाड---३२.४---८.०

सांगली---३६.३---१८.० सातारा---३५.२---१५.२ सोलापूर---३७.४---१८.६ सांताक्रूझ---३५.९---१८.५ डहाणू---३३.२---१७.५ रत्नागिरी---३५.९---१८.५ छत्रपती संभाजीनगर---३५.०---१६.६ धाराशिव---३४.६---१५.६ परभणी---३६.५---१७.१ परभणी (कृषी)---३५.१---११.७ अकोला---३६.७---१७.३ अमरावती---३५.८---१५.३ भंडारा---३४.८---१६.४ बुलडाणा---३५.०---१६.८ ब्रह्मपुरी---३७.२---१५.५ चंद्रपूर---३६.४---१६.० गडचिरोली---३४.६---१६.० गोंदिया---३४.४---१५.४ नागपूर---३६.५---१५.० वर्धा---३६.०---१५.८ वाशीम---३३.४---२१.६ यवतमाळ---३५.४---१६.०

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३७.४, ब्रह्मपुरी ३७.२, अकोला ३६.७, जेऊर ३६.५, परभणी ३६.५, नागपूर ३६.५, चंद्रपूर ३६.४, सांगली ३६.३, वर्धा ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT