Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: उद्यापासून पावसाचा जोर वाढणार; विदर्भातील अनेक भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Monsoon Rain Update: विदर्भ आणि कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भ आणि कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला. 

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे. माॅन्सूनचा ट्रफ बिकानेर, जयपूर, दातिया, सिधी, असनमोल, कोलकाता ते पूर्व आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे.

ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील सरीसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा उत्तर गुजरात ते छत्तीसगड, झारखंड दरम्यान आहे. 

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यातही पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. इतर जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. 

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्येही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

Agri Pump Cable Theft: कृषिपंपांच्या केबल चोरीने शेतकरी त्रस्त

Raisin Deals: बेदाणा सौदे ‘झीरो पेमेंट’साठी २५ ऑक्टोबरनंतर महिनाभर बंद

Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना

SCROLL FOR NEXT