Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होतोय

Rain Update : जून महिन्यात विदर्भात पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Pune News : जून महिन्यात विदर्भात पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात ही पावसाने हजेरी लावली.

सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमधील दहादेवाडी मंडलात १४५.३ मिलिमीटर तर यवतमाळमधील जवळा मंडलात १२८.५ मिलिमीटर पाऊस पडला. या मुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असल्याचे दिसून येत असून खरिपातील पिकांना दिलासा मिळाला.

राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. तर वाशीम, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आहे.विदर्भात सुरुवातीपासून पाऊस प्रमाण कमी राहिला आहे.

मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पोषक हवामान तयार झाल्याने दोन दिवसांपासून भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांत बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. त्यानंतर यवतमाळ, वर्धा भागात पावसाचा जोर वाढला आहे.

यवतमाळमधील कळगाव, तूपटाकळी मंडलात ११६.३ मिलिमीटर, तर मालखेड १११.३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचले होते. पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना नवसंजीवनी मिळाली.

कोकणातही मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही वेळा पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पालघरमधील जव्हार मंडलात सर्वाधिक ९७.८ मिलिमीटर पाऊस पडला. रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी भात रोपे लागवडीस आली असून पावसामुळे काही ठिकाणी लागवडीला सुरुवात झाली आहे. असाच जोर कायम राहिल्यास भात लागवडीला चांगलाच वेग येण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत पश्चिमेकडील भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दहाडेवडी मंडलानंतर हरसूल, देवळा मंडलात ९०.० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे खरिपातील पिकांना चांगलाच वेग आला आहे.

पुणे जिल्ह्यातील वेल्हा मंडलात ७९.५ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्वर मंडलात ८०.०, लामज ५६.८, कोल्हापुरातील बावडा मंडलात ६०.३ मिलिमीटर पाऊस पडला असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडल्या. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

या पावसामुळे शेतकरी सुखावले. परभणीतील जिंतूर मंडलात ५२.३ मिलिमीटर, चिखलठाणा ८३.५, हिंगोलीतील सिरसम ७९.५, बासंबा ६७.३, डोंगरकड ५०.३, आंबा ६८.८, गिरगाव ५०.०, टेंभुर्णी ५९.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण होते.

सोमवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत : कृषी विभाग)

कोकण :

अंगाव ५९.०, खर्डी ५०.८, तलवट ४५.०, भेडशी ५६.३, वाडा ८९.३, कोणे ८९.३, कांचगड ६०.५, साइवन ७९.५, कसा ७४.०, पालघर ६२.५, मनवर ९८, सफला ६४.८, अगरवाडी ६३.८, साखर ८९.५, मोखडा ८८.३, खोडला ९१.३, विक्रमगड ८६.८, तलवड ७९.५.

मध्य महाराष्ट्र :

नाशिक : मोहाडी ५१.३, उमराळे ५७.३, ननाशी ५३.८, इगतपुरी ५५.०, घोटी ६६.८, धारगाव ८३.८, पेठ ७६.५, त्र्यंबकेश्वर ७०.०, वेळुंजे ८९.५.

विदर्भ :

पार्डी टाकमोर ६२.०, मानोरा ५६.८, कुपटा ६२.८, गुहीखेड ७१.५, बटकुली ६२.०, तळेगाव ६२.०, यवतमाळ ७८.३, हिवरी, अर्जुना ८४, अकोला बाजार ५६.५, येळबारा ५४.८, कोळंबी ५९.३, सावरगड ७८.३, मोहा ८६.३, लोहारा ८३.५, घारफळ ६२.०, पाहूर ७१.५, कळंब ६५.०, पिंपळगाव ९३.५, सावरगाव ८७.५, जाडमोहा ६९.०, दारव्हा ६५.०, चिखली ६१.५, मांगकिन्ही ६६.५, बोरी ८३.०, लडखेड, महागाव ९२.५, दिग्रज ५२.८, सीनगड ७२.८, आर्णी ९८.३, बोरगाव ९८.३, खंडाळा ८५.५, बोराळा ७४.०, ब्राह्मणगाव ७८.०, जांब ७८, दारटी ५३.८, कळी ६८.८, राळेगाव ७०.०, कन्नमवरग्राम ६१.३, वर्धा, अंजी ५२, सिल्लोड ५९.०, सेवाग्राम ८१.०, झाडसी ७५.३, केळझर ७८.८, देवळी ५०.५, अंदोरी ९२.०, बोरी ७६.५, गोधनी ५२.८, कामठी ६०.५, कोराडी ५१.८, टकलघाट ७६..५, नागरधन, रामटेक ८२.३.

पाऊस दृष्टिक्षेपात...

- मराठवाड्यात ढगाळ हवामानासह, अधूनमधून ऊन पडले.

- यवतमाळ, नागपूरमध्ये ढगाळ हवामान.

- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव भागात ढगाळ वातावरण.

- कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी.

- घाटमाथ्यावर हलक्या सरी कायम.

- पावसामुळे कोकणात भात लागवडीला सुरुवात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT