Rain  Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढणार; बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज

Rain Forecast: राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामान राहून अधून मधून हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील मागील ३ दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामान राहून अधून मधून हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, कोकणात आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

उद्या विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला.

बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा तसेच मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातही बुधवारी पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारीही विदर्भ, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

Poultry Farming: मुसळवाडीत कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद

Farm Loan Waiver: थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Akot APMC: ‘एसआयटी’ चौकशीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT