Weather Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढला  

Weather Update : आज कोकण, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : पावसानं उघडीप दिल्यानं राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय. त्यामुळं उकाड्यातही वाढ जाणवू लागली आहे. तर काही ठिकाणी पावसाची भुरभुर हजेरी लावतेय. आज कोकण, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर बहुतांश भागात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच शनिवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 

राज्यात आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची भुरभुर हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपर्यंत बहुतांश भागात पाऊस उघडीप राहण्याचा अंदाज आहे.. 

शनिवारी मात्र मराठवाड्यातील नांदेड, लातूर. धाराशिव, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर रविवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानं काही भागात शेती कामांना वेग आला आहे. तर काही भागात उन्हाचा चटका वाढल्यानं सकाळी टवटवीत दिसणारी पिकं दुपारी मात्र मान टाकू लागली आहेत. हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT