Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : तमिळनाडू, केरळमध्ये पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात गारवा काहीसा वाढला

Weather Update : तमिळनाडू आणि केरळ राज्यातील अनेक भागात पाऊस लावत आहे. तर महाराष्ट्रात काही भागात हवेतील गारवा काहीसा वाढला आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतात किमान तापमान घटलेले आहे. तर दक्षिण भारतातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी सुरु आहे. तमिळनाडू आणि केरळ राज्यातील अनेक भागात पाऊस लावत आहे. तर महाराष्ट्रात काही भागात हवेतील गारवा काहीसा वाढला आहे.

उत्तर भारतातील किमान तापमान कमीच आहे. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. तर नैऋत्य बंगालच्या उपसागरात आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस पडत आहे.

तमिळनाडू, केरळ आणि शेजारच्या भागात १५ डिसेंबर, १८ डिसेंबर आणि १९ डिसेंबर रोजी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर १६ आणि १७ डिसेंबर रोजी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

राज्यात आता थंडी काही प्रमाणात वाढत आहे. सकाळी हवेतील गारवा जाणवत आहे. पण अद्यापही राज्यात कडाक्याची थंडी नाही. राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहिशी घट झाली. तसेच पुढील पाच दिवसही राज्यातील तापमान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील कोणत्याही भागात सध्या तरी पावसाचा अंदाज नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT