Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Latest Rain Update : मागील आठवड्यात कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे.

Team Agrowon

Weather Update : मागील आठवड्यात कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. १२) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, कोटा, गुना, सागर, पेंद्रारोड, बालासोर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

वायव्य मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका वाढू लागला असून उकाडा देखील वाढला आहे. आज (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राचे संकेत

उत्तर अंदमान समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची प्रणाली पूर्व -मध्य बंगालच्या उपसागरात मनारच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यत कायम आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत (ता. १४) या भागात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

गुरूवारपासून पाऊस वाढण्याचे संकेत

राज्यातील पावसाची उघडीप आणखी दोन दिवस राहणार असून, गुरूवारपासून (ता. १४) राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने शुक्रवारपासून (ता. १५) राज्याच्या अनेक भागात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

तुरळक मध्यम पावसाची शक्यता :

पालघर, ठाणे, रायगड, सातारा, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT