Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा इशारा

Rain Update: आज (ता. ११) विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसाचे सावट कायम आहे. आज (ता. ११) विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून कोकण, उत्तर महाराष्ट्र ते मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. शनिवारी (ता.१०) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे देशातील उच्चांकी ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.६ अंश तापमानाची नोंद झाली. ‎‎ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथे ४० अंशांपेक्षा अधिक, ‎वर्धा, अकोला, ‎यवतमाळ, ‎‎भंडारा येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎‎‎‎सोलापूर, ‎परभणी, अमरावती व वाशीम येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

‎आज (ता. ११) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे आहे.

शनिवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३२.८---२०.४

‎‎धुळे---३४.०---१९.६

‎जळगाव---३६.५---१९.५

‎जेऊर---३७.५---२०.०

‎कोल्हापूर---३४.१---२२.८

महाबळेश्वर---२४.५---१६.४

‎मालेगाव---३५.६---२१.५

‎नाशिक---३३.२---१९.४

‎निफाड---३४.४---१९.२

‎सांगली---३५.६---२२.५

‎सातारा---३२.२---२१.१

‎सोलापूर---३८.३---२५.४

‎सांताक्रूझ---३३.३---२३.५

डहाणू---३३.३---२४.८

‎रत्नागिरी---३२.५---२३.९

‎छत्रपती संभाजीनगर---३५.६---२४.५

‎धाराशिव---३७.४---२३.४

परभणी---३८.५---२५.७

‎परभणी (कृषी)---३७.५---२५.०

‎अकोला---३९.२---२७.१

अमरावती---३८.४---२१.८

‎‎भंडारा---३९.०---२२.०

‎बुलडाणा---३६.२---२४.०

‎ब्रह्मपुरी---४०.१---२४.१

‎चंद्रपूर---४०.०---२६.४

‎गडचिरोली---३७.८---२४.०

‎गोंदिया---३७.७---२४.०

‎नागपूर---४०.६---२६.६

‎वर्धा---३९.५---२६.७

‎वाशीम---३८.२---निरंक

‎यवतमाळ---३९.२---२७.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२१.८---४०.६

‎मराठवाडा---२३.४---३८.५

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१६.४---३८.३

‎उत्तर महाराष्ट्र---१९.२---३६.५

‎कोकण---२३.५---३३.३

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

‎३९ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎नागपूर ४०.६, ‎ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०, ‎वर्धा ३९.५, अकोला ३९.२, ‎यवतमाळ ३९.२, ‎‎भंडारा ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Speaker Controversy: विधानसभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य

Land Acquisition Protest: पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध

APMC Investigation Report: बाजार समिती चौकशी अहवाल मोघम, त्रोटक

Land Record Reform: खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्शाची होणार नोंद

Cotton Farmer Issue: स्लॉट बुक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

SCROLL FOR NEXT