Marathwada Rain Update
Marathwada Rain Update Agrowon
हवामान

Marathwada Rain Update : मराठवाड्यात कुठे हलक्या सरी, तर कुठे रिमझिम पाऊस

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील बहुतांश भागात बुधवारपासून (ता. १५) विजांच्या कडकडाटासह कुठे तुरळक तर कुठे रिमझिम व कुठे हलक्या पावसाच्या (Rain Update) सरी पडणे सुरूच आहे.

गुरुवार दुपारपर्यंत मराठवाड्यात आकाशात ढगांची गर्दी व अवकाळीच कमी अधिक बरसणे सुरूच होते. जालन्यात एका ठिकाणी तुरळक गारपीटही झाली. शेती पिकाचे अवकाळी पाऊस नुकसान करत असून या अवकाळीच्या संकटाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून तर गुरुवारी दुपारपर्यंत जालना जिल्ह्यातील जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, भोकरदन, अंबड, सुखापुरी, कुंभार पिंपळगाव आदी ठिकाणी पावसाची हजेरी लागली.

तर दिवसभर अनेक भागात आकाशांमध्ये ढगांची गर्दी असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही. तळणी परिसरात गुरुवारी दुपारी तुरळक बारीक गारपीट झाली.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, किल्ले धारूर, माजलगाव, टाकरवन आदी परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून कुठे रिमझिम तर कुठे मेघगर्जनेसह अधून मधून पावसाच्या सरी बरसल्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडसावंगी परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. याशिवाय लोहगाव, महालगाव, पिशोर, नागापूर, पिरबावडा, चिंचोली लिंबाजी, गल्लेबोरगाव, जायकवाडी, चापानेर, फुलंब्री, टाकळी राजेराय, आदी ठिकाणी कुठे तुरळक रिमझिम तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या.

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरासह चित्तेपिंपळगाव, आडगाव, निपाणी, आपतगाव, भालगाव, एकोड, पाचोड, पळशी, शेंद्रा आदी परिसरातही अधून मधून पावसाच्या सरीवर सरी झाल्या.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरोरी, ईट, तुळजापूर, इटकळ, परंडा आदी परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या काढणीला आलेल्या पिकासह फळ पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

आताच्या घडीला पिक आहे त्या अवस्थेतच काढून घेण्याची लगबग शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे पिकाच्या दर्जावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवकाळीच्या संकटाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजेनंतर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काही भागात पावसाचा तसेच विजांच्या कडकडाटाचा जोर वाढला होता.

या जिल्ह्यांत तुरळक पाउस

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या सात जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कमी अधिक प्रमाणात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली.

विजांच्या गडगडाटासह कुठे रिमझिम तर कुठे अधून मधून सरीवर सरी, तर कुठे क्षणात थोडा जोरदार असा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT