Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Drought Money for Karnataka farmers : गेल्या काही दिवसापासून कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 
Karnataka Drought farmers
Karnataka Drought farmersAgrowon

Pune News : कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असा दावा कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी केला आहे. महसूल मंत्री गौडा यांनी सांगितले की, येत्या दोन-तीन दिवसांत सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. कर्नाटकला केंद्र सरकारकडून ३, ४५४.२२ कोटी रुपये मिळणार आहे. पण याआधीच राज्य सरकारने ३३.५८ लाख शेतकऱ्यांना सरकारी तिजोरीतून ६३६.४५ कोटी रुपयांची अंतरिम मदत देण्यात आली होती. यामध्ये अल्प भूधारक असलेल्या ४.४३ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर ही सर्व मदत त्यांच्या पात्रतेनुसार देण्यात आली आहे.

पुढे गौडा म्हणाले, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच मिळणार असून ती येत्या दोन-तीन दिवसांत मिळेल. गौडा म्हणाले की, ६ मे पर्यंत २७.३८ लाख शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषातंर्गत एकूण २, ४२५.१३ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. आतापर्यंत याचा लाभ ३१.८२ लाख शेतकऱ्यांना मिळाला असून उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांना काही दिवसांत त्यांच्या हक्काची नुकसान भरपाईची रक्कम मिळेल.

Karnataka Drought farmers
Water shortage in Karnataka : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पाणीबाणी, १४ हजारपैकी ७ हजार बोअरवेल पडले बंद

तसेच अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ५,६६२ कोटी रुपयांचा या विनंतीत समावेश आहे. कर्नाटकने १३ सप्टेंबर २०२३ रोजी २२३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. दुष्काळामुळे ४८ लाख हेक्टरवरील पिके नष्ट होऊन ३५, १६२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला होता.

Karnataka Drought farmers
Karnataka Drought Condition : केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार?

राज्य सरकारच्या रिटवर सुनावणी

दरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (ता. ०६) सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यावरून उत्तर देण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये दुष्काळग्रस्त भागात मदत कार्य सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे १८,१७४ कोटी रुपयांची मागणी केली होती.

यावेळी केंद्र सरकारला या रिट याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यावरून कर्नाटकला दुष्काळ निवारणासाठी दिलेली आर्थिक मदत सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जारी करण्यात आल्याचे ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी केंद्र सरकारतर्फे म्हटले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com