Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: पावसाची अनेक ठिकाणी उघडीप

Rain Update: राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. घाटमाथ्यावर अजूनही काही प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Pune News: राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. घाटमाथ्यावर अजूनही काही प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालेरे, येडगाव मंडलात ६६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे अजूनही धरणांत आवक सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी विदर्भात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. तर अनेक नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे, त्यामुळे हळूहळू पूरपरिस्थिती नियंत्रणात येत आहे.

मात्र शेतात अजूनही पाणी असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. या भागात पावसाने उघडीप दिली असली तरी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. कोकणात पावसाने काहीशी उघडीप दिली असल्याने भात लागवडीने वेग घेतला आहे. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

घाटमाथ्यावर अजूनही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहे. ताम्हिणी घाटमाथ्यावर ६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर शिरगाव ५६, दावडी ५४, डुंगरवाडी ४०, कोयना ३६, भिरा ३२, आंबोणे २५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर लोणावळा, शिरोटा, ठाकूरवाडी, वानगाव, भिवपुरी, खोपोली, खांड, धारावी या घाटमाथ्यांवर पावसाने उघडीप दिली आहे.

तर काही वेळा अधूनमधून शिडकावा होत आहे. या भागात कमी झाला असला तरी धरणांत अजूनही आवक सुरू असल्याने नाशिक, कृष्णा, भीमा खोऱ्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात अधूनमधून ऊन पडत असल्याने पिके वाफसा स्थितीत आली आहेत. त्यामुळे या भागात शेतात आंतरमशागतीच्या व खुरपणीच्या कामांना वेग येऊ लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

India US Deal : अमेरिकेसोबतच्या करारात भारत शेतीसह विविध मुद्यांवर ठाम राहणार का?

Solapur DPC Meeting: पीकविमा, वीज, पाणीप्रश्नावर चर्चा

Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ

SCROLL FOR NEXT