Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain: पावसाचा जोर कमी होणार; माॅन्सूनचा राज्यात मुक्काम; दोन दिवस वाटचाल थांबण्याची शक्यता

Maharashtra Rain Update: माॅन्सूनने आज राज्यात प्रगती केली नाही. मात्र बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतात माॅन्सूनने प्रगती केली. पुढील २ दिवस माॅन्सून राज्यात एकाच जागेवर मुक्काम करण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने आज राज्यात प्रगती केली नाही. मात्र बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतात माॅन्सूनने प्रगती केली. पुढील २ दिवस माॅन्सून राज्यात एकाच जागेवर मुक्काम करण्याची शक्यता आहे. तर आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

माॅन्सूनने आज राज्यात कालच्याच भागात मुक्काम केला. माॅन्सूनची अरबी समुद्राती शाखा मंदावली आहे. तर बंगालच्या उपसागरात माॅन्सूनने प्रगती केली. माॅन्सूनने आज ईशान्य भारतातील पूर्ण राज्ये व्यापली. छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती केली. तसेच उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, हिमालयाकडील पश्चिम बंगालचा काही भाग, संपूर्ण सिक्कीम माॅन्सूनने व्यापले.

माॅन्सूनची सिमा आज मुंबई, अहिल्यानगर, आदीलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. मात्र माॅन्सून पुढील २ दिवसांत पश्चिम बंगाल आणि विदर्भातील काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यात दोन दिवस माॅन्सून प्रगती करण्याची शक्यता कमीच आहे. 

हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज दिला. आज अनेक भागात पावसाची शक्यता आहे. बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच कोकण, मराठवड्यातील सर्व जिल्हे, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या भागांत हलक्या सरी पडतील. मात्र विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी आणि रविवारी देखील विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

SCROLL FOR NEXT