Rain  Agrowon
हवामान

Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

Monsoon Update : माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा दोन दिवसांपासून थबकला आहे. माॅन्सूनने राज्यात आतापर्यंत नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतली आहे.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा दोन दिवसांपासून थबकला आहे. माॅन्सूनने राज्यात आतापर्यंत नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतली आहे. तर राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत.  हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. 

माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा दोन दिवस थबकला. माॅन्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्ली आणि राजस्थानच्या सर्व भागातून माघारी फिरला.  तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली. 

पण दोन दिवसांपासून माॅन्सून एकाच जागेवर होता. म्हणजेच आजही माॅन्सूनची सिमा नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.  

हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर पुणे, धाराशिव, लातूर, नगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला होता. 

उद्या सिंधूदूर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा तसेच विदर्भातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच रत्नागिरी, रायगड, पुणे, सोलापूर, नगर, नाशिक, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. 

बुधवारी विदर्भातील बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे. गुरुवारही राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT