Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज; पुढील चार दिवस राज्यातील वातावरण कसे राहील?

Weather Update : राज्यातही आजही काही भागात ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी आजही हलक्या पावसाचा अंदाज होता. मिचाॅन्ग चक्रीवादळ जमिनीवर येऊन त्याचे अतितीव्र दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यातही आजही काही भागात ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी आजही हलक्या पावसाचा अंदाज होता. मिचाॅन्ग चक्रीवादळ जमिनीवर येऊन त्याचे अतितीव्र दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे.

अतितीव्र चक्रीवादळ, मिचाॅन्ग काल आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बापतला भागात धडकले. आज या अतितीव्र चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र दाब क्षेत्रात झाले होते. हे तीव्र दाब क्षेत्र आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारी भागात होते.

तर तेलंगणाच्या आग्नेय भागात आणि लगतच्या दक्षिण छत्तीसगड तसेच दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये अनेक भागात पाऊस पडत आहे. तसेच केरळ आणि तमिळनाडूतही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत.

राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण होते. तर लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. तसेच ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहील, असेही सांगितले. तर पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

पावसाळी वातावरण निवळल्याने शेतकरी आता शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला आहे. तर प्रशासनाला पंचनाम्याचे काम पूर्ण करण्यास मदत होणार आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT